'...उद्या उशीरा येईन!' Gen Z कर्मचाऱ्याने मॅनेजरला थेट मेसेज केला; पोस्ट VIRAL

Gen Z Employee Message Manager To Compensate Late Night Work :  Gen Z कर्मचाऱ्यानं केलेल्या मेसेजवर संताप व्यक्त करत मॅनेजरनं सोशल मीडियावर केली पोस्ट... जणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

दिक्षा पाटील | Updated: Nov 13, 2024, 07:14 PM IST
'...उद्या उशीरा येईन!' Gen Z कर्मचाऱ्याने मॅनेजरला थेट मेसेज केला; पोस्ट VIRAL  title=
(Photo Credit : Social Media)

Gen Z Employee Message Manager To Compensate Late Night Work : आजकालची तरुण पिढी किंवा मग Gen Z हे त्यांच्या अफाट क्रिएटिव्हीटीसाठी ओळखले जातात. त्यांची बोलण्याची पद्धत, राहण्याची स्टाईल ही त्यांना सगळ्यांपासून वेगळं करते. Gen Z हे सगळ्यांमध्ये उठून दिसतात. इतकंच नाही तर कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता ते जो मुद्दा आहे तो थेट मांडताना दिसतात. आता हे फक्त बोलतानाच नाही तर मेसेज असो किंवा मग ऑफिशियल मेल किंवा मेसेज. अनेकदा तर त्यांचे मॅनेजर हे त्यांच्या ज्युनियर अर्थात Gen Z नं केलेले मेसेज हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात एका Gen Z कर्मचाऱ्यानं Overtime केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उशिरा येणार असल्याचा मेसेज केल्यासंबंधीत आहे.

खरंतर, ऑफिसमध्ये शिफ्ट संपल्यानंतरही थांबून काम करणं यात Millennials ला कोणत्याही प्रकारची अडचण नसते. शिफ्ट संपल्यानंतरही ते थांबतात आणि काही तक्रार न करता ते काम करतात. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी जी नेहमीची ऑफिसची वेळ आहे त्या वेळेला ऑफिसला हजर राहतात. मात्र, त्यांच्या उलट Gen Z हे वेळेत येऊन वेळेत काम संपवून घरी जाणं पसंत करतात. कारण त्याशिवायही आयुष्य आहे अशा विचाराचे ते असल्याचं सतत म्हटलं जातं आणि त्यांच्या काहीशा या स्वभावामुळे त्यांना कामावर ठेवताना अनेक HR किंवा मॅनेजर विचार करतात. असचं काहीसं वकील आयुषी देसाई यांच्यासोबत झालं आहे. आयुषी देसाई यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ज्युनियरनं शेअर केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांच्या ज्युनियरनं केलेला मेसेज आहे. त्यात त्या ज्युनियरनं म्हटलं आहे की 'हॅलो, सर आणि मॅडम, उद्या मी सकाळी 11:30 वाजता ऑफिसमध्ये येईल, कारण मी आता रात्री 8:30 वाजता ऑफिसमधून निघतोय.' 

दरम्यान, आयुषी देसाई यांना त्यांच्या या ज्युनियरनं केलेला मेसेज मुळीच पटला नाही. त्यांनी सोशल मीडियावर त्या ज्युनियरच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, 'माझ्या ज्युनियरनं मला केलेल्या मेसेजवर मला विश्वास बसत नाही. ही आजकालची मुलं, ही काहीतरीच आहेत... तो उशिरापर्यंत थांबला, तर आता उद्या तो ऑफिसमध्ये उशिरा येणार. काय मेसेज केलाय. मी निशब्द झाले.' आयुषी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हेही वाचा : विकी कौशल दिसणार परशुरामाच्या भूमिकेत! 'महावतार'चं अंगावर काटा आणणारं मोशन पोस्टर

अनेक नेटकऱ्यांनी त्या तरुणाची बाजू घेत सांगितलं की 'आजकाल कर्मचाऱ्यांचं जे शोषण होतंय आणि त्यातही त्यावर कोणी काही बोलत नाही. तुमच्या ज्युनियरला जे काही अपेक्षित आहे त्यात काही चूक नाही. तो जितके तास काम करतो त्यासाठीच त्याला पैसे दिले जातात. जर तो वेळेत काम करत नसेल तर तू चुकीच्या मानसाची निवड केली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यानं जे काही केलं ते योग्य केलं. मला आशा आहे की इतरही त्याच्याकडून काही शिकतील.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मुळात तू त्याला 8.30 वाजे पर्यंत काम करु का दिलं?'