3 पत्नी, 13 मुलं... सोनेरी राजवाडा, समुद्रातील तरंगणारं महाल, 2000000000000 ट्रिलियनचा मालक आहे तरी कोण?

Trending News : कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल-थानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादामुळे दोन शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची पुन्हा एकदा चर्चा होतेय. 

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2024, 08:20 PM IST
3 पत्नी, 13 मुलं... सोनेरी राजवाडा, समुद्रातील तरंगणारं महाल, 2000000000000 ट्रिलियनचा मालक आहे तरी कोण? title=
Trending News in Marathi

Trending News : कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचं चुलत भाऊ शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांनी माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वाद कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणामुळे कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्या संपत्तीची चर्चा होतेय. 

कतारचा शेख कोण? 

शेख तमीम इब्न हमाद अल थानी हे कतारचे शासक, अमीर आणि अरबस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. 3 जून 1980 रोजी जन्मलेला तमीम हा कतारच्या माजी शेख हमाद बिन खलिफा अल थानी यांचा चौथा मुलगा आहे. त्यांचं सुरुवातीचे शिक्षण लंडनमधील प्रसिद्ध हॅरो स्कूलमध्ये झाले. यानंतर तो रॉयल मिलिटरी अकादमीत पुढील शिक्षण घेतलं. 

शेख तमीमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यात सामील झाला आणि सेकंड लेफ्टनंट बनला. 2003 मध्ये त्याचा मोठा भाऊ शेख जासीम याने सिंहासनावरील आपला दावा सोडला. यानंतर त्याच्यासाठी अमीर (कतारचा शासक) होण्याचा मार्ग मोकळा झाला. 2013 मध्ये, तमीमचे वडील हम्माद बिन खलिफा यांनी अचानक राजीनामा जाहीर केला आणि तमीमला कतारचा अमीर घोषित करण्यात आलं.

'द इकॉनॉमिस्ट'च्या वृत्तानुसार, शेख हम्मादच्या कुटुंबातील बहुतांश लोक कतारच्या लष्करापासून ते सरकारपर्यंत विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत. कतारचे अमीर शेख तमीम यांनी एकूण 3 विवाह केले असून त्यांना 13 मुलं आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख तमीम एकटा 1.6 अब्ज पौंडचा मालक आहे. त्याच वेळी, राजघराण्याची एकूण संपत्ती सुमारे 335 अब्ज डॉलर्स आहे. शेख तमीम दोहाच्या रॉयल पॅलेसमध्ये राहतो.

जगातील सर्वात महागड्या घरात वास्तव!

रॉयल पॅलेस हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक मानलं जातं आणि त्याची किंमत अंदाजे एक अब्ज डॉलर्स इतकी आहे. राजवाड्याच्या काही भागात सोन्याचे काम करण्यात आलंय. 500 वाहनांसाठी 100 हून अधिक खोल्या आणि पार्किंगची सोय आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, शेख तमीमला 2019 मध्ये ओमानमध्ये स्वतःसाठी आणखी एक पॅलेस बनवला गेला, ज्याचे नाव 'व्हाइट पॅलेस' आहे. व्हाईट पॅलेस हा हुबेहुब दोहाच्या रॉयल पॅलेससारखाच असून इथेही लक्झरीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रॉयल आणि व्हाइट पॅलेसशिवाय शेख तमीमची लंडन, अमेरिका आणि जगातील इतर देशांमध्ये मालमत्ता आहेत.

 

हेसुद्धा वाचा -  कोट्यवधीच्या हिऱ्यासाठी 2 शाही राजघराणी आमने-सामने, कोर्टात पोहोचला वाद, काय आहे नेमकं प्रकरण?

 

समुद्रात 'फ्लोटिंग पॅलेस'चा मालक

शेख तमीम महिन्यातील काही दिवस त्याच्या या यॉटवर घालवतो, ज्याचे नाव कटारा आहे आणि ही जगातील सर्वात महागडी आणि लक्झरी यॉट असल्याचे म्हटलं जातं. सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स किमतीची ही नौका समुद्रात तरंगणाऱ्या महालासारखी आहे. या 124 मीटर लांबीच्या यॉटमध्ये हेलिपॅड आणि अनेक डेक आहेत. 35 पाहुणे आणि 90 क्रू मेंबर्सच्या एकाच वेळी राहण्याची व्यवस्था आहे.

कतारच्या शेख यांचीही खासगी विमान कंपनी आहे . 'कतार अमीरी एअरलाइन्स'चा पाया सन 1977 मध्ये घातला गेला होता, जी केवळ शाही कुटुंब आणि सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांना सेवा देते. अहवालानुसार, या एअरलाइनमध्ये सध्या किमान 14 विमाने कार्यरत आहेत, ज्यात तीन बोईंग 747 आहेत. प्रत्येक जहाजाची किंमत 400 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

फुटबॉल क्लबचे मालक

शेख तमीम यांनाही आलिशान कारचे शौकीन असून त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या कार आहेत. ते बुगाटीपासून फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉइसपर्यंतच्या वाहनांमध्ये दिसतात. तमिमला खेळात प्रचंड रस आहे. त्यांच्या पुढाकारानेच कतारला फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळाले. शेख तमीम हा सेंट जर्मन फुटबॉल क्लबचाही मालक आहे. अलीकडेच राजघराण्याने एससी ब्रागामध्ये सुमारे २२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. हा पोर्तुगालमधील सर्वात प्रमुख फुटबॉल क्लबपैकी एक आहे.