'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?

'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये  जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल? 

Updated: Dec 10, 2014, 10:56 AM IST
'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी? title=

मुंबई : 'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये  जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल? 

आयआयटीअन्सच्या प्लेसमेंटचं मॅनेजमेंट करण्यासाठी आयआयटी कॅम्पसमध्ये ही प्लेसमेंट सेल उभारण्यात आलीय. याठिकाणी जागभरातल्या बड्या कंपनीज ज्या विद्यार्थ्यांचे इंटरव्यू घेण्यासाठी आयआयटी कॅम्पसमध्ये येत असतात त्यांचं समन्वय करण्याचं काम याठिकाणी चालतं. पण सध्या या कामासोबतच इथल्या मॅनेजर पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच देशभरातल्या शेकडो पालकांचे फोन कॉल्स रिसिव करावे लागत आहेत. 
 
आयआयटीमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना रग्गड पगाराच्या नोकऱ्या मिळाल्यात. वर्षाला ६५ लाखापर्यंतची पॅकेजेस मिळालीत... ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच देशभरातल्या पालकांनी आपापल्या मुलांसाठी 'आयआयटी'ची स्वप्न रंगवायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आयआयटीच्या प्लेसमेंट सेलवर शेकडो फोन यायला सुरुवात झाली. विविध प्रश्नांनी पालकांनी भंडावून सोडलं. पण, यातल्या बहुतांश पालकांचा प्रश्न होता की आयआयटीच्या कोणत्या स्ट्रीममध्ये सगळ्यात जास्त पगार मिळतो? 

अशा प्रश्नांची उत्तरं देणं प्लेसमेंटसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय. विद्यार्थ्यांना हवं तेच स्ट्रीम घेऊ द्या, असं काऊन्सिलिंग जास्त करावं लागतंय. पण समस्त पालकांनी असा आग्रह धरण्याआधी जास्त पगाराच्या हव्यासापायी आपल्या मुलांचं करिअर उध्वस्त करत नाही ना, याचा विचार करणं आवश्यक आहे.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.