कामगारी दिनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर

एसटी कर्मचा-यांना 6 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सरकारनं एसटी कर्मचारी आणि अधिका-यांना हे अनोखं गिफ्ट दिलंय. या वाढीमुळं महागाई भत्ता 113 टक्क्यांवरुन 119 टक्के इतका होणार आहे.. याचा फायदा महामंडळातील एक लाखाहून अधिक कर्मचा-यांना होणार आहे.

Updated: May 1, 2016, 09:05 PM IST
कामगारी दिनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर title=

मुंबई : एसटी कर्मचा-यांना 6 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सरकारनं एसटी कर्मचारी आणि अधिका-यांना हे अनोखं गिफ्ट दिलंय. या वाढीमुळं महागाई भत्ता 113 टक्क्यांवरुन 119 टक्के इतका होणार आहे.. याचा फायदा महामंडळातील एक लाखाहून अधिक कर्मचा-यांना होणार आहे.

जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या ७ महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मे २०१६ च्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.