मुंबईतल्या सात स्टेशनवर फ्री वायफाय

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रेल्वेनं मुंबईकरांना गिफ्ट दिलं आहे.

Updated: Aug 15, 2016, 04:05 PM IST
मुंबईतल्या सात स्टेशनवर फ्री वायफाय  title=

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रेल्वेनं मुंबईकरांना गिफ्ट दिलं आहे. मुंबईतल्या सात स्टेशनवर फ्री वायफाय देण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी ट्विटरवरून केली आहे. विशेष म्हणजे पुढच्या सात दिवसांमध्ये हे वायफाय नागरिकांना वापरायला मिळेल असंही प्रभू म्हणाले आहेत. 

चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई, वांद्रे, खार, भायखळा, ठाणे, पनवेल या सात स्टेशनवर फ्री वायफायची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशभरामध्ये 400 स्टेशनवर ही सुविधा द्यायचा रेल्वेचा निर्धार आहे. जानेवारी महिन्यामध्ये मुंबई सेन्ट्रल स्टेशनवर गुगल आणि रेलटेलनं फ्री वायफायला सुविधा द्यायला सुरुवात केली होती.