दादर येथील आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाचे नुकसान

दादरमध्ये कबुतरखान्याजवळ टायटन शो रुमला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयाची अनेक पुस्तकं जळून खाक झालीत. दरम्यान, भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Updated: Jan 6, 2015, 10:17 PM IST
दादर येथील आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाचे नुकसान  title=

मुंबई : दादरमध्ये कबुतरखान्याजवळ टायटन शो रुमला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयाची अनेक पुस्तकं जळून खाक झालीत. दरम्यान, भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दादर स्टेशनजवळ टायटनच्या शोरूमला लागलेल्या आगीत आज मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं मोठं नुकसान झालंय. साडेआठच्या सुमाराला दादरला भरवस्तीत असलेल्या टायटनच्या दुकानाला आग लागली.

ही आग अग्निशमन दलाने पाऊणतासात आटोक्यात आणली खरी. मात्र या आगीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं मोठं नुकसान झालंय. ग्रंथ संग्रहालयातली अनेक पुस्तकं जळून खाक झाली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.