रावसाहेब दानवे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची आज निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे हे सध्या केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री आहेत.

Updated: Jan 6, 2015, 06:15 PM IST
रावसाहेब दानवे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष title=

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची आज निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे हे सध्या केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री आहेत.

दानवे हे जालना मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. दानवे यांच्यामुळे मराठवाड्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद चालून आलंय.

विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपचं प्रदेशाध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं. मात्र पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार फडणवीस यांना आपल्याकडील अध्यक्षपद सोडावं लागणार होतं. रावसाहेब दानवे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनाही आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि खासदार रावसाहेब दानवे या दोघांची नावे चर्चेत होती. मात्र आज रावसाहेब दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दानवे हे गेली ३० वर्षे राज्याच्या राजकारणात आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांचा दांडगा अनुभव आणि राजकारणावरील पकड लक्षात घेऊन दानवे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे बोलले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.