३ मिनिटात रेल्वे रिझर्वेशन, नवीन वेबसाइट लवकरच!

रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या सध्याच्या वेळखाऊ प्रक्रियेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. काही क्षणांत ऑनलाइन तिकिट बुकिंग करता येणार आहे. जास्तीत जास्त तीन मिनिटांत रेल्वे रिझर्वेशन करता येणार आहे आणि ते ही ट्रांजेक्शन फेल्ड न होता.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 13, 2013, 07:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या सध्याच्या वेळखाऊ प्रक्रियेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. काही क्षणांत ऑनलाइन तिकिट बुकिंग करता येणार आहे. जास्तीत जास्त तीन मिनिटांत रेल्वे रिझर्वेशन करता येणार आहे आणि ते ही ट्रांजेक्शन फेल्ड न होता.

इंडियन रेल्वे लवकरच एक नवी वेबसाइट सुरु करणार आहे. सध्याच्या साइटच्या तुलनेत ही खूप फास्ट असणार आहे. आता प्रवाशांना एक तिकिट बुक करताना १० मिनिट लागत असतीत तर, या नव्या साइटवर अवघे दोन ते तीन मिनिटे लागतील असा दावा रेल्वेच्या सूत्रांनी केला आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये रेल्वेची नवी वेबसाइट सुरु होणार आहे. युजर्स जेव्हा तिकिट बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइट लॉग इन करतील तेव्हा त्यांना होमपेजवर नव्या वेबसाइटचे ऑप्शन मिळेल. या साइटवर ते तिकिट बुक करू शकतात.
रेल्वेच्या नव्या वेबसाइटवर रेल्वेबाबत अन्य माहितीही देण्यात येणार आहे. जर्मनीतील एका कंपनीच्या मदतीने रेल्वे ही नवी वेबसाइट तयार करत आहे. इंडियन रेल्वेच्या आयटी सिस्टिमपेक्षाही शानदार आणि आधुनिक असणार आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर एक मिनिटाला दो हजार तिकिट ऑनलाइन बुकिंग केले जातात. परंतु नव्या सिस्टिमवर एका मिनिटात सुमारे सात हजार तिकिट बुक केले जाणार आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दररोज पाच लाख तिकिटे बुक केले जातात. नोव्हेंबरपासून सुरु होणार्यास रेल्वेच्या नव्या आणि फास्ट वेबसाइटवर एक दिवसात 15 लाख ऑनलाइन तिकिटे बुक केली जातील.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.