www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महालक्ष्मी रेसकोर्सबद्दल राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांच्या हिताचे जे असेल, तेच करावे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जागा महानगरपालिकेची आहे, तेव्हा तेच ठरवतील रेसकोर्सचं काय करायचंयअसं म्हणत राज ठाकरेंनी रेसकोर्सच्या प्रश्नाला बगल दिली. शिवाजी पार्कवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची राज ठाकरेंची कल्पना प्रत्यक्षात येत आहे. आज या योजनेचा शुभारंभ झाला.
महालक्ष्मी रेस कोर्ससंदर्भात काँग्रेसनेही सावध प्रतिक्रिया दिली होती. महापालिका जो प्रस्ताव पाठवेल त्यावर सरकार निर्णय घेणार असल्याचं मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरें यांनी व्यक्त केलंय. रेसकोर्सचे लीज वाढवयचे की त्या मैदानाचा वापर दुस-या कामासाठी करायचा याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात येईल असंही माणिकरावांनी स्पष्ट केलं.
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय उद्यान व्हावं ही माझी कल्पना आहे. मात्र त्या उद्यानाला बाळासाहेबांचे नाव दिल्यास त्याचं स्वागत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं . रेसकोर्सच्या भूखंडाची लीज महिनाअखेर संपणार आहे. त्यामुळं हा भूखंड मुंबई महापालिकेच्या ताब्यात जाणार आहे. या भूखंडावर आता आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची चर्चा सुरु झालीये. लीज वाढवून दिली जाऊ नये यासाठी मुंबईचे महापौर सुनील प्रभू प्रयत्नशील आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.