छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज, पुतणे समीर यांना इडीची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.

Updated: Jan 30, 2016, 03:23 PM IST
छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज, पुतणे समीर यांना इडीची नोटीस  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.

हायकोर्टाच्या सूचनेनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. ८०० कोटींच्या गैरव्यवहारांबाबत ही नोटीस आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, नवी मुंबईत खारघरमधील ४४ कोटींच्या हेक्जावर्ल्ड गृहप्रकल्पाबाबतची तक्रार तसंच इंडोनेशियास्थित कोळसा प्रकल्पाशी सबंधीत पैशांचा व्यवहार यावर इडीनं नोटीस बजावली आहे.

भुजबळ कुटुंबियांच्या मालकीची सिंगापूरमधील कंपनी आर्मस्ट्रॉंग ग्लोबल आणि आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर यांनी इंडोनियाशातील काही कोळसा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच 'फेमा' आणि मनी लॉन्ड्रींग कायद्यानुसारही चौकशी केली जाणार आहे.