मुंबई : मुंबईमधली लोकलची गर्दी हा मुंबईबाहेरच्यांना कायमच धडकी भरवणार विषय... मात्र या गर्दीतही कधीकधी प्रवास सुखकर होऊ शकतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सध्या काहीसा असाच अनुभव येतोय.
रेल्वे फलाटावर आणि जिन्यावर कचरा दिसतो. कोणी पिचकारी मारलेली दिसते. मात्र, हे चित्र तुम्हाला आता पाहायला मिळणार नाही. गर्दी, गचाळपणा, घाण-कचरा हेच बघायची सवय असल्यामुळे कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल...
मुंबईतलं एक रेल्वे स्टेशन. बोरिवली, खार, माटुंगा या स्टेशनवर गेलात तर तुम्हाला हा सुखद धक्का बसेल. कुठल्या पायऱ्या सप्तरंगी. तर कुठल्या अथांग समुद्राचा फील देणाऱ्या. तर एखाद्या जिन्यात बसवलेले एलईडी.
खांबांवर रंगीबेरंगी चित्रं., थ्री-डी पेंटिंग्ज, असा साज दिसतो. मेकिंग अ डिफरन्स म्हणजेच मॅड फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं हा उपक्रम हाती घेतलाय. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता संस्थेचे ५०० स्वयंसेवक या मेकओव्हरमध्ये सहभागी झालेत. त्यांना सामान्य प्रवाशांची साथ लाभतेय.
आगामी काळात सगळ्याच स्थानकांचा असा मेकओव्हर करण्याचा रेल्वेचा मानस आहे. या संस्थेचा आहे. मुंबईकर वर्षानुवर्ष जीव आणि नाक मुठीत धरूनच प्रवास करत आलेत. बोरिवली, माटुंगा आणि खारच्या या मेकओव्हरकडे बघितलं की मुंबईकरांवर अखेर प्रभूकृपा झाल्याचं दिसतंय. आता गर्दी कमी व्हावी आणि या चित्रकलेचा पुरेपुर आनंद घेता यावा, हीच अपेक्षा.