मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अपूर्ण राहीलं. गलेगठ्ठ पगारदारही आता मुंबईबाहेर घरे घेत आहेत.
कारण मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईत टुबीएचके असणारी 52 हजार घरे विक्री अभावी रिकामीच असल्याचे लीयासीस फाँरेस या रिअल ईस्टेट क्षेत्रात संसोधन करणाऱ्या कंपनीच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न उराशी बाऴगणाऱ्या गलेगठ्ठ पगारदार तर भाड्याने का होईना, पण मुंबईतच घर घेतात. पण ही घरे सर्वसामान्य चाकारमान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. गेल्या वर्षी मुंबई महानगरात 1 लाख 47 हजार घरे विक्रीविना तशीच पडून राहिली. यामध्ये 45 हजार घरे मुंबई शहरात तर 1 लाख 30 हजार घरे मुंबई उपनगरात तशीच पडून राहिली आहेत. या घरांमध्ये फक्त स्वयंपाक घरच 1 हजार चौरस मीटर आहे. अशी मोठी घरे मुंबईत 50 लाख ते 1 कोटी रुपयांत आहेत आणि घर मिळण्याचे स्वप्न केव्हाच अपूर्ण राहीलं. आता घरांच्या किमती 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत.
नविन घरे बांधण्यात घट
गेल्या 3 महिन्यात 3 वेळा घरांचे भाव वाढल्यामुळे नविन घरे बांधण्यात सात टक्के घट झाली आहे. वाढत्या महागाईत घरांचे भाव वाढवण्याशिवाय पर्याय नाही, तर महाग घरे विक्रीविना तशीच पडून आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक नविन घरे बांधण्यासाठी तयार नाहीत. दरम्यान मुंबईत 50 लाख ते 1 कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री 36 टक्क्यांनी खाली आली आहे. तर 25 ते 50 लाख रुपये किमतीच्या घरांची विक्री 29 टक्क्यांनी खाली आली आहे. पुढच्या 6 महिन्यांत आर्थिक विकासाचा दर वाढेल आणि घरांच्या किमती खाली येतील असा अंदाज आहे. दिल्ली,चेन्नई,बंगळुरू शहरातही समान परिस्थिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.