घर बिनधास्त विका, बिल्डरच्या NOCची गरज नाही,

यापुढे घरांच्या विक्रीसाठी बिल्डरच्या NOC ची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सदनिकांची विक्री आणि पुनर्विक्री करताना फसवणुकीचे प्रकार घडतात.

Updated: Oct 2, 2012, 08:35 AM IST

www.24taas.com, मुंबई
यापुढे घरांच्या विक्रीसाठी बिल्डरच्या NOC ची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सदनिकांची विक्री आणि पुनर्विक्री करताना फसवणुकीचे प्रकार घडतात.
मुख्यमंत्र्यांकडे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्याची तातडीनं दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. मोफा कायद्यात विकासकाच्या कोणत्याही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. घराच्या विक्रीसाठी आता घरमालकाला बिल्डरवर अवलंबून राहावे लागणार नाही.
जबाबदारी पूर्णपणे विकासकाची
विकासकाकडून इमारत पूर्ण बांधून झाल्यावर सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्याची जबाबदारी पूर्णपणे विकासकाची आहे. तसेच विशिष्ट कालावधीत इमारत ज्या जमिनीवर बांधली आहे त्या जमिनीचे अभिहस्तांतरण संबंधित गृहनिर्माण सोसायटीच्या नावे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी विकासकाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
तक्रार कोठे नोंदवाल
विकासकाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय विक्री, पुनर्विक्रीची नोंदणी कायदेशीर आहे. तरीही कुठल्या शासकीय अधिकार्यायने या प्रमाणपत्रासाठी आग्रह धरल्यास ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.