मुंबई : महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी आपला अंकुश ठेवण्यासाठी व्युहरचना केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी आयुक्तांसह एक स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भाजपच्या कोअर समितीची आज बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेनेला भाजपपेक्षा दोन जागा अधिक मिळाल्या आहेत.
जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि भाजप या कौलचा अनादर करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले आहे.