छगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated: Mar 17, 2016, 05:33 PM IST
छगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी title=

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची आज गुरुवारी एकत्र चौकशी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयात (ईडी) ही चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर समीर भुजबळ यांची पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

 

छगन भुजबळ यांना अटक झाल्यापासून पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासोर बसवून चौकशी करण्यात आली. तब्बल चार तास ही चौकशी चालली.

 

सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ईडी भुजबळांना अटक केली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.