मालाड: मालाडमध्ये अक्सा बीचवर विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मालाडच्या अक्सा बीच परिसरातल्या ज्युरासिक पार्कमध्ये पिकनिकसाठी हे तरूण गेले होते. त्यावेळी विषारी दारू प्यायल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. तसंच 10 पेक्षा जास्त जण गंभीर आहेत.
त्यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस कमिश्नर यांनी प्रकरणाचा तपास क्राइम ब्रान्चकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.