भुजबळांची बँक खाती गोठवण्याचे अधिकार 'एसीबी'ला!

मुंबई हायकोर्टाच्या नव्या आदेशामुळं माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडलीय. 

Updated: Jun 18, 2015, 07:01 PM IST
भुजबळांची बँक खाती गोठवण्याचे अधिकार 'एसीबी'ला!   title=

मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या नव्या आदेशामुळं माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडलीय. 

गरज भासल्यास भुजबळांची मालमत्ता जप्त करण्याचे किंवा त्यांची बँक खाती गोठवण्याचे सर्वाधिकार हायकोर्टानं आज 'अॅन्टी करप्शन ब्युरो'च्या विशेष तपास पथकाला दिलेत. त्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही, असं मुंबई हायकोर्टानं आज स्पष्ट केलं. 

दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना लायब्ररी जमीन वाटप घोटाळा आणि नवी मुंबईतील गुन्ह्याप्रकरणी भुजबळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल एसीबीनं आज कोर्टात सादर केला. 

भुजबळ यांच्या 16 मालमत्तांवर एसीबीनं मंगळवारी छापे घातले होते. तर भुजबळ आणि अन्य आरोपींविरूद्ध अंमलबजावणी संचलनालयानंही दोन गुन्हे नोंदवले असून, त्याबाबतची माहितीही हायकोर्टाला देण्यात आली.

भुजबळांविरूद्ध अन्य केसेस प्रकरणी 20 जुलैपर्यंत अहवाल सादर करा, असे आदेशही हायकोर्टानं यावेळी एसीबीला दिले. आप आणि भाजप नेत्यांनी सादर केलेल्या पीआयएल प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतची पुढील सुनावणी येत्या 22 जुलै रोजी होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.