www.24taas.com,मुंबई
कुर्ला-नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाचखोर ३६ मुंबई पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.
आयुक्तांनी मुंबई पोलिसांच्या या लाचखोरीचं अप्रत्यक्षरित्या समर्थनच केल्याचं मानलं जातंय. या प्रकरणी नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या तब्बल ३६ पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. आर. आर. पाटील यांनी काल ही घोषणा केली असतानाच आयुक्तांनी हा अजब तर्क लढवून पोलिसांचं कृत्य पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलंय.
अनधिकृत बांधकामांमुळे मुंब्रा येथून जवळ असलेल्या शिळफाटा येथे ७४ जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच अशाच अनधिकृत बांधकामांसाठी लाच उकळणार्याश ३६ पोलीस कर्मचार्यां वर गृहखात्याने निलंबनाची कारवाई केली खरी. मात्र, पोलीस आयुक्तांनी पोलिसांनाच पाठिशी घालण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.
चेंबूर येथील एका बांधकामप्रकरणी लाच घेणाऱ्या नेहरूनगर पोलीस ठाण्यातील तब्बल ३६ पोलीस कर्मचार्यां ना निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. त्यांचे निलंबनही झाले.
भ्रष्ट सरकारी यंत्रणेचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने केंद्रीय नागरी परीक्षा देणार्यार एका तरूणाने याचे स्टींग ऑपरेशन केले होते. त्या छायाचित्रणाच्या सीडी त्या तरूणाने मुंबई पोलीस आणि लोकायुक्तांना सादर केल्या होत्या. मीडियाने हे स्टिंग ऑपरेशन प्रसारीत केल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेत लाच घेताना दिसणार्याय तब्बल ३६ पोलीस कर्मचार्यांपना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले.
दरम्यान, लाचखोरीच्या तक्रारींची दखल न घेणार्याा अधिकार्यांदचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले. मात्र, आज झी २४ तासने वारंवार संपर्क साधूनही गृहमंत्री आपली प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे वेगळ्या चर्चेला बळ मिळाले आहे.