मुंबई : गोरेगावमधल्या एनएससी कम्पाऊंडच्या ठिकाणी मुंबई भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला.... यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची जोरदार भाषणं झाली. यावेळी, 21 तारखेला शिवसेनेला पाणी पाजणार, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केलीय.
- भाजपचं मुंबईशी आणखी एक नातं... भाजप देशातला एकमेव राष्ट्रीय पक्ष ज्याची स्थापना याच मुंबईत झालीय
- छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे छत्रपतींप्रमाणे पारदर्शी कारभार करतील
- मराठी माणसामागे उभा राहिल तो भाजपा
- गिरगावातील विस्थापितांना मोठं घरं
- मुंबईत परिवर्तन होणारच, परिवर्तन अटळ
- एकाच तिकीटात तुम्हाला मेट्रो, मोनो, रेल्वे, बसचा वापर करता येईल
- मुंबईत मेट्रोचं जाळं तयार करतोय
- गरीब, सामान्य, मध्यमवर्गीयांना घरं देणार
- कोळी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही
- चार वर्षात मुंबई - नवी मुंबई असा भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू पूर्ण करणार
- 'करून दाखवलं' आम्ही म्हणणार नाही... जनताच आम्हाला म्हणेल 'होय करून दाखवलं'
- अफूची गोळी देणं बंद व्हायला हवं
- आत्तापर्यंत जनतेला केवळ अफूची गोळी दिली
- सत्ता आल्यास सर्वसामान्यांसाठी काम करणार
- 60 जागा दिल्या तेव्हा पारदर्शक अजेंडा तुम्हाला मान्य नाही हे स्पष्ट झालं - मुख्यमंत्री
- 21 तारखेला आमची औकाद आणि तुमची औकाद दाखवून देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका
- काँग्रेस-राष्ट्रवादीशी विचारांची तर शिवसेनेशी आचारांची लढाई - मुख्यमंत्री
- शिवसेनेनं काडीमोड घेतला असला तरी त्यांच्याशी आमचा वैचारिक मतभेद नाही तर त्यांचे आचार मान्य नाहीत - मुख्यमंत्री
- भगवा झेंडा हातात घेऊन खंडणी मागायची - सेनेला टोला
- शिवाजी महाराज भाषणांपुरते ठेवायचे आणि त्यांच्या नावाने खंडण्या वसूल करायच्या, म्हणून आमची पारदर्श अजेंडाची मागणी होती - मुख्यमंत्री
- पारदर्शकतेबद्दल बोललो यात माझं काय चुकलं - मुख्यमंत्री
- तुमच्या विचारांशी नाही तर आचाराशी फारकत आहे, तुमचे विचार वेगळे आणि आचार वेगळे - मुख्यमंत्री
- विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या 151 जागांच्या हट्टामुळे युती तुटली - मुख्यमंत्री
- आम्ही करमणूक आणि जुगलबंदी करणारे लोक नाही, आम्ही नोटबंदी, भ्रष्टाचार बंदी करणारे लोक आहोत - मुख्यमंत्री
- मी शिवसेनेला कौरव म्हणणार नाही कारण सत्तेत मी त्यांच्या मांडीला मंडी लावून बसलोय, मुख्यमंत्र्यांचा आशिष शेलार यांना टोला
- मी कुणाला दुर्योधन म्हणणार नाही... कारण, मला हे मान्य होणार नाही, की आम्ही राज्यात कौरव सेनेसोबत बसलोय - मुख्यमंत्री
- युती तुटली नसती तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो...
- युती तुटली म्हणूनच भाजपनं एकहाती लढाई केली आणि त्यांना त्यांची शक्ती समजली - मुख्यमंत्री
- मनसेशी छुपी युती करण्यासाठी शिवस्मारक, बाळासाहेबांच्या स्मारकाचा शिवसेनेला विसर- आशीष शेलार
- शिवसेनेच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा उल्लेख नाही, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला
- गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतली गुन्हेगारी कमी केली हे आमचं मुंबईशी नातं आहे- आशीष शेलार
- मुंबईशी आमचं नातं विकासाचं आहे, आशिष शेलार यांचं वक्तव्य
- कोणाचा तरी खून करून आपला पक्ष वाढावा ही आमची संस्कृती नाही - आशिष शेलार
- एवढी मोठी पांडव सेना असताना कौरवांचा पराभव होणार, Did You Know ही अहंकाराची भाषा- आशिष शेलार
- हम किसो को छेडंगे नही, लेकीन किसी ने छेडा तो छोडेंगे नही, आशिष शेलार यांचा इशारा
- आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेला कौरवांची, भाजपला पांडवांची आणि मुख्यमंत्र्यांना कृष्णाची उपमा
- जेव्हा जेव्हा अहंकार माजला तेव्हा तेव्हा पराभव झाला. मीच शिव भक्त असे म्हणणा-या रावणाचा पराभव झाला - आशिष शेलार
- महाभारताचे युद्ध हे एकाच गोष्टीने घडले ते म्हणजे अहंकार, युद्ध टाळण्याची आवश्यकता होती तसे प्रयत्नही झाले, आशिष शेलार यांची शिवसेनेवर नाव न घेता टीका
- हा राज्य स्तरीय मेळावा नाही तर बुथ प्रमुखांचा मेळावा आहे. मात्र काही लोकांना राज्य स्तरीय मेळावे या बंद ठिकाणी घ्यावा लागतात. आम्हाला राज्य स्तरीय मेळावा घ्याचा असेल तर बीकेसी मैदान लागले, आशिष शेलार यांचं वक्तव्य
गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मुंबई पालिकेच्या स्वच्छ, पारदर्शी कारभाराचा मुद्दा भाजप पुन्हा या मेळाव्याद्वारे कसा मांडतो हे पाहणं सुद्धा यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे.