जळगाव : युती तुटल्याच्या घोषणेनंतर आता ख-या अर्थानं कलगीतूरा सुरू झालाय. युती तुटल्याने आता तुम्ही फटाके फोटा पेढे वाटा. पण निकालानंतर आम्हीच पेढे वाटू, फटाके फोडू असा दावा केलाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी. ते जळगावात बोलत होते.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी होतीच असंही यावेळी गिरीश महाजन म्हणाले.