पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Updated: Apr 7, 2017, 04:45 PM IST
पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड  title=

मुंबई : पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, हल्लेखोरास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलीय.   

- विधेयकातील तरतुदीनुसार, पत्रकारावर कार्य बजावत असताना त्यावर हल्ला केल्यास हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपये दंड अथवा दोन्ही होऊ शकतं 

- पत्रकारांना कार्य बजावण्यासाठी लागणाऱ्या मालमत्तेचं नुकसान केल्यास त्यांना नुकसान केलेल्या मालमातेच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल. 

- दुसऱ्या बाजूला कुठल्याही पत्रकारानं खोटी तक्रार केल्यास आणि हे सिद्ध झाल्यास त्या पत्रकारालाही तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही होऊ शकतो.

- पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल.

- जखमी पत्रकाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा हल्ला करणाऱ्याला करावा लागेल.