काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे बुकिंग आता मोबाईल अॅपवर

ओला-उबेरच्या धर्तीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीची बुकिंग कारण्यासाठी मोबाईल अॅप येत्या तीन महिन्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. यामुळे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या वापराने काळी-पिवळी टॅक्सी ट्रॅकिंग सिस्टमवर उपलब्ध होईल आणि प्रवाशांची सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, मुख्यमंत्री म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2017, 03:44 PM IST
काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे बुकिंग आता मोबाईल अॅपवर title=

मुंबई : ओला-उबेरच्या धर्तीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीची बुकिंग कारण्यासाठी मोबाईल अॅप येत्या तीन महिन्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. यामुळे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या वापराने काळी-पिवळी टॅक्सी ट्रॅकिंग सिस्टमवर उपलब्ध होईल आणि प्रवाशांची सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, मुख्यमंत्री म्हणालेत.

ओला आणि उबेर खासगी टॅक्सी सेवा चालकांवर निर्बंध घालण्याबाबत राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निर्बंधाबाबतची नियमावली लागू केल्याची माहिती दिली. 

यावर किरण पावसकर यांनी ओला-उबेर प्रमाणे काळी-पिवळी टॅक्सींवर सुद्धा निर्बंध आणि नियमावली लागू करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. काळी-पिवळी टॅक्सी संघटना ग्राहकांना सर्व्हिस न देता उलट सरकारला धारेवर धरतात असल्याचं मत मांडलं. टॅक्सी चालक मग्रुरीने वागत असून नियम धाब्यावर बसवत असल्याचे मत जयंत पाटील यांनीही व्यक्त केलं. यावर रावते यांनी याची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करू, असे आश्वासन दिले.