आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना

आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मुंबईत आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 19, 2017, 09:11 AM IST
आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना title=

मुंबई : आयटीआय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मुंबईत आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. आयटीआयच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेतल्या हॉल तिकीट आणि आसन व्यवस्थेचा घोळ झाला. त्यामुळे दादरच्या शारदाश्रम शाळेच्या सेंटरवर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड या वेळेत आयटीआयची ही परीक्षा होती. 

हकनाक विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत ताटकळत रहावं लागलं. दरम्यान मुंबईतल्या इतर सेंटर्सवर परीक्षा व्यवस्थित पार पडली. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या विलंबानंतर ही परीक्षा होत होती. 

मात्र त्यातही घोळ झाल्यानं शारदाश्रम शाळा केंद्रावरच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. अखरे तब्बल साडेचार तासानंतर शारदाश्रम केंदावर परीक्षा सुरु झाली.