पेट्रोलचा तुटवडा जाणवणार, दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईसह देशभरातील पेट्रोलियम वितरकांनी दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद कायम ठेवली आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईतील 250 पेट्रोलपंपांपैकी बहुतांश पेट्रोल पंपांतील इंधनसाठा संपण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 4, 2016, 08:46 AM IST
पेट्रोलचा तुटवडा जाणवणार, दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद  title=

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईसह देशभरातील पेट्रोलियम वितरकांनी दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद कायम ठेवली आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईतील 250 पेट्रोलपंपांपैकी बहुतांश पेट्रोल पंपांतील इंधनसाठा संपण्याची शक्यता आहे.

दरम्यान या परिस्थितीत तिन्ही सार्वजनिक तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सकाळी पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. त्यातून सकारात्मक मार्ग निघाल्यास इंधन खरेदीवरील बहिष्कार मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

मात्र, चर्चा फिस्कटली तर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा पडण्याची शक्यता अधिक आहे. कारण दुपारपर्यंत हा साठा पुरेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल उपलब्ध असून सुद्धा ते वितरकांनी खरेदी केले नसल्याने वाहन चालकांना मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे याचा परिणाम हा दळवळणार पडण्याची शक्यता आहे.