मोदी आणि लता मंगेशकरांच्या उपस्थितीत `ऐ मेरे वतन के लोगों`

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेलं `ऐ मेरे वतन के लोगों` या गीताला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

Updated: Jan 19, 2014, 09:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेलं `ऐ मेरे वतन के लोगों` या गीताला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.
या गीताची सूवर्ण जयंती साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईत २७ जानेवारी रोजी या गीताचा सुवर्ण जयंती समारोह साजरा केला जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार १ लाख गायक लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत एक साथ गाणार आहेत. यावेळी लता मंगेशकरही उपस्थित राहणार आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख गायकांसोबत लता मंगेशकरही हे गीत गातील अशी शक्यता आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत २७ जानेवारी १९६३ रोजी पहिल्यांदा लता मंगेशकर यांनी `ऐ मेरे वतन के लोगों` हे गीत गायलं होतं.
लता मंगेशकर यांनी हे गीत, १९६२ साली भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून गायिल होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.