www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘रन मुंबई रन’चा नारा देत मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. लहानग्यांपासून तर अगदी ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले.
सहा विविध गटात ही मॅरेथॉन झाली. मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीमरन, सिनिअर सिटीझन, अपंग आणि व्हिलचेअर मॅरेथॉन होती. जवळपास ४० हजार स्पर्धेक या स्पर्धेत धावले. ६ किलोमीटरची ड्रिम रन ही तर साऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या प्रकारात सामान्य मुंबईकरांपासून सेलिब्रेटीजनी या प्रकारात आपला स्टॅमिना आजमावला.
४२ किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनवर केनियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. केनियाचा इव्हास रुटोनं मॅरेथॉन जिंकली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही केनियाच्याच धावपटूंनी बाजी मारली. लॉरेन्स किमाईयो आणि फिलेमॉन बारु तिसऱ्या क्रमांकावर आला.
तर वुमेन्स मॅरेथॉन इथियोपियाच्या दिन्केश मेकाशनं जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकावर केनियाची ग्लॅडिस किपसोई आली. तिसऱ्या पोझिशनवर इथियोपियाच्याच दिजुनेश उडगेसानं बाजी मारली. भारतीय गटात पुरुषांमध्ये करण सिंग पहिला, रशपाल सिंग दुसरा तर बिनिंग लिन्कोई तिसरा आला. महिलांमध्ये या वर्षीही महाराष्ट्राचाच झेंडा दिसला. ललिता बाबरनं २ तास ५० मिनिटं आणि ३१ सेकंदांची वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर विजय माला पाटील दुसऱ्या स्थानावर आणि ज्योती गवातेनं तिसरा क्रमांक पटकावला.
दरम्यान, मुंबई मॅरेथॉन आणि साताऱ्यातील ललिता बाबर हे जणू समीकरणचं बनत चाललं आहे. यंदाच्या फुल मॅरेथॉनमध्ये ललिता पवारनं बाजी मारत हॅट्ट्रिक साधली. गेल्यावर्षीपेक्षा बेस्ट टायमिंग देत तिनं आपला जलवा पुन्हा दाखवला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.