www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सरकारी नोकरीत मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफासर राज्य सरकारनं नेमलेल्या एका अभ्यासगटानं केलीय.
अलीगढ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महेमुद्दूर रहेमान यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याऱ्या अभ्यासगटाचा अहवाल आज सरकारला सादर करण्यात आला. या अहवालात मुस्लिम समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत शिफारशी करण्यात आल्यात. सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबरोबरच गृहनिर्माण संकुलांमध्येही काही घरं आरक्षित ठेवण्याबाबत शिफारशी यात करण्यात आल्यात.
रहेमान यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.