मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. ३ संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती आहे. हे दहशतवादी मुंबईत फिरत आहेत. याबाबत दोघांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने घातपात होण्याची शक्यता वर्तविली असून राज्यांना अलर्ट जारी केलाय.
एटीएस आणि क्राइम ब्रांच पोलीस या तीन दहशतवाद्यांच्या मार्गावर आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, काहीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी दोघा संशयितांचे स्केच जारी केलेय.
एका रिक्षा चालकांने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तीन जण हल्ला करण्याबाबत बोलत होते, असे या रिक्षा चालकांने पोलिसांना माहिती दिली. मुंबईत हल्ला करण्यासाठी हे मलेशियातून आल्याची माहिती पोलिसांची आहे.
हे तिघे मलाय भाषेत संभाषण करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सियोन उड्डाण पुल ब्रिज येथून हे तिघे एक बॅग घेऊन रिक्षाने जात होते. विक्रोली येथील उड्डाण पुल पार केल्यानंतर त्यांनी ऐरोली टोल नाका येथे रिक्षा नेण्यास सांगितली, अशी माहिती रिक्षा चालकाने पोलिसांना दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.