शाळकरी मुलीचे एमएमएस बनवणारे जेरबंद

मुंबईत दोन मुलांना एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करुन एमएमएस बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. हे आरोपी एमएमएस दाखवून या मुलीला वर्षभर ब्लॅकमेल करत होते.

Updated: Dec 17, 2011, 08:02 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत दोन मुलांना एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करुन एमएमएस बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. हे आरोपी एमएमएस दाखवून या मुलीला वर्षभर ब्लॅकमेल करत होते. याप्रकरणी आणखी एका व्यक्तीचं नाव समोर येतय. मात्र त्याच्या राजकीय कनेक्शनमुळे पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय.

 

परेश कुरे नावाचा मुलगा मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. परेशने आक्टोबर २०१० मध्ये शाळेत शिकणाऱ्या एका ओळखीच्या मुलीला घरी बोलावलं. तिला गुंगीचं औषध  देऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढंच करुन तो थांबला नाही त्याने या लज्जास्पद घटनेचा एमएमएस बनवला. आणि नंतर याच एमएमएसच्या जोरावर तो या मुलीला घरी बोलावून मनमानी करायचा. त्यानं त्याच्या या दुष्कृत्यात त्याचा मित्र अविनाश सावंतलाही सामील करुन घेतलं. या दोघांनी मिळून वर्षभर या असहाय्य मुलीचं लैंगिक शोषण केलं. अखेरीस या मुलीने पोलीसांना एक निनावी पत्र लिहून मदतीची याचना केली.

 

 या आरोपींनी या मुलीवर अमानवी अत्याचार केले. न्यायालयाने या दोघांची १७ डिसेंबरपर्यँत पोलीस कोठडीत रवानगी केलीय. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचं नावं पुढे आलंय. मात्र त्या व्यक्तीचं राजकीय कनेक्शन पाहता पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येतोय.

 

[jwplayer mediaid="14471"]