ऊस, कापूस, धान व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांतच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची आज भेट घेतली. यावेळी उसाला २३००रूपये भाव द्या, अशी मागणी केली.
यावेळी शिवसेनेच्यावतीने शेतकर्यांवच्या विविध समस्यांचे व प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. ऊसाला २३०० रूपये भाव देण्याचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला.
कापसाला ६००० रुपयांची उचल मिळायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय. साखरेवरची निर्यातबंदी उठवण्याची मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही ऊस प्रश्नासंदर्भात संबंधित मंत्र्यांची बैठक बोलावलीय.