LIVE: कडोंमपा-कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत ८१ जागांसाठी मतदान होतंय.

Updated: Nov 1, 2015, 03:28 PM IST
LIVE: कडोंमपा-कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु title=

दुपारी ३ वाजता -

- कोल्हापूर महापालिका निवडणूक, दुपारी तीन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

- महापालिकेसाठी आतापर्यंत २८ टक्के मतदान

दुपारी १ वाजता -

कोल्हापूर महापालिका निवडणूक: दुपारी एक वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान

दुपारी १२ वाजता -

कोल्हापुरात १२ वाजेपर्यंत ३०% मतदान 

सकाळी ९.३० वाजता- 

सकाळी साडे नऊपर्यंत कल्याण-डोंबिवलीत ८, त्या २७ गावांमध्ये १५ टक्के तर कोल्हापुरात २० टक्के मतदान

सकाळी ९ वाजता-

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातले नागरिक मतदानाचा आपला मुलभूत अधिकार बजावण्यासाठी मतदान केंदांवर गर्दी करु लागले आहेत. निवडणूक आयोगानं सुद्धा या जागरुक मतदारांचा आगळा वेगळा सन्मान केला. मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पहिल्या पन्नास मतदारांना, निवडणूक आयोगानं तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा सन्मान केला. 

कल्याण/कोल्हापूर: कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. त्यापैकी प्रभाग क्र. ४६, १०५ आणि ११३ ची निवडणूक बिनविरोध झालीय.. तर प्रभाग क्र. ११४ आणि ११९ मध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळं आता ११७ जागांसाठी साडेसातशे उमेदवारांचं भवितव्य मतदार ठरवतील.

कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी शिवसेनेचे ११५, भाजपचे १०९, मनसेचे ८५,काँग्रेसचे ५६, राष्ट्रवादीचे ४५, एमआयएमचे ६, रिपाइंचे (आ)६, बसपाचे २५, बहुजन विकास आघाडीचे २०, समाजवादी पार्टीचे २, पीपल्स पार्टीचे १, भारिपचे ०६, फॉरवर्ड ब्लॉकचे ९, सीपीआयचे ४, राष्ट्रीय समाज पक्षाचे ८, कम्युनिस्टचे १ तर ११७ प्रभागांतून २५२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

आणखी वाचा - भाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या

तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण ८१ जागांसाठी ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात काँग्रेसचे ८१, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८०, शिवसेनेचे ८१, भाजपचे ३७, ताराराणी आघाडीचे ३९, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ३, आरपीआयचा १, रासपचे १३, एसफोरएचे १२, शेकापचे १२, अ.भा हिंदू महासभेचे ५, बसपाचे ३, कम्युनिस्ट पार्टीचे ४, बहुजन विकास आघाडीचे २ आणि अपक्ष १३१ उमेदवार आपलं नशिब आजमावणार आहेत. 

दोन्ही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय.. 

आणखी वाचा - प्रचार संपल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.