मुंबई : ऍट्रोसिटी कायद्याबाबत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी. राज्याला पवार निती नेमकी माहिती आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली. या संदर्भात विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ऍट्रोसिटीचा हत्यारासारखा सर्वाधिक वापर झाल्याचं पवार म्हणतात. पण राज्यात जास्तीत जास्त काळ हे आघाडीचं सरकार होतं. याचा अर्थ या सरकारच्या काळातच या कायद्याचा हत्यारासारखा वापर झाला का असा सवाल उद्धव यांनी विचारला. मराठा समाजाचे मोर्चे हे समाजाची भावना व्यक्त करतात, पण हे गैरसमज सरकारने दूर करावेत असं ठाकरे म्हणाले.
वरळीतले पोलीस काँस्टेबल विलास शिंदे हुतात्मा झाले त्याविषयी पवार काही बोलत नाहीत पण आयसीसविषयी कळवळा व्यक्त करतात, पोलीस रस्त्यावर शहीद व्हायला आहेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.