ठाण्यात मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला बोनेटवरुन अर्धा किमी फरफटत नेले

मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्याबाबत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होता होता टळली. एका वाहतूक पोलिसाला कार चालकाने बोनेटवर बसवून फरफटत अर्धा किमी नेले. 

Updated: Sep 3, 2016, 02:14 PM IST
ठाण्यात मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला बोनेटवरुन अर्धा किमी फरफटत नेले title=

ठाणे : मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्याबाबत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होता होता टळली. एका वाहतूक पोलिसाला कार चालकाने बोनेटवर बसवून फरफटत अर्धा किमी नेले. नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानतेने अनर्थ टळला.

नरसिंग महापूरे या पोलीस हवालदाराने रस्त्याच्या उलट्या बाजूने भरधाव वेगाने जाणारी कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, गाडीचालक योगेश भांबरेने महापुरे यांना उडवले. त्यांचा त्यानंतर बोनेटवर तोल गेला आणि ते पडलेत. या कार चालकाने त्यांना कारच्या बोनेटवरुन जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या कार चालकाने गाडी वाकडी तिकडी करत त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महापूर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

योगेश भांबरे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने महापुरे यांचा जीव वाचलाय. या घटनेनंतर ठाणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत संतापाचे वातावरण आहे.