नागपुरात स्वाईन फ्लूची दहशत... बारा जणांचा बळी

स्वाईन फ्लूने ऐन उन्हाळ्यात नागपुरात दहशत निर्माण केली आहे.

Updated: Apr 13, 2017, 08:59 PM IST
नागपुरात स्वाईन फ्लूची दहशत... बारा जणांचा बळी title=

नागपूर : स्वाईन फ्लूने ऐन उन्हाळ्यात नागपुरात दहशत निर्माण केली आहे.

एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात स्वाईन फ्लूने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहचलीय. त्यामुळे यावर्षीच्या साडे तीन महिन्यातच स्वाईन फ्लूने तब्बल बारा जणांचा बळी घेतलाय. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

नागपुरात शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अमरावतीच्या चार, मध्य प्रदेशातील एक तर नागपुरातील 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. सध्या 14 रुग्ण उपचार घेत असून त्यापैंकी 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.

2016 मध्ये स्वाईन फ्लूने दोन रुग्ण दगावले होते. उन्हाच्या कडाक्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव होत असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी जाणं टाळावं, बाहेरुन आल्यावर स्वच्छ पाण्याने हात धुवावे, सर्दी-ताप खोकला असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलंय.