अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरच!

महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे कितीही दाखले दिले जात असले तरीही अंधश्रद्धा अजूनही गावागावांत आहेत. अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरुन अजूनही उतरत नाहीय. सत्तेत येणाऱ्या नव्या सरकारपुढे हे मोठं आव्हान असणार आहे. 

Updated: Oct 30, 2014, 08:44 PM IST
अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरच!  title=

देवळा/सुरगाणा: महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे कितीही दाखले दिले जात असले तरीही अंधश्रद्धा अजूनही गावागावांत आहेत. अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरुन अजूनही उतरत नाहीय. सत्तेत येणाऱ्या नव्या सरकारपुढे हे मोठं आव्हान असणार आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे हे ७१ वर्षांचे तुकाराम माळघरे.. सुरगाणा तालुक्यातलं देवळा हे त्यांचं गाव.... पण सध्या त्यांना आणि त्यांच्या नातवंडांना स्वतःच्याच गावात परतण्याची भीती वाटतेय.  त्याला कारण आहे अंधश्रद्धा आणि त्या अंधश्रद्धेतून झालेली मारहाण... जेव्हा सगळीकडे प्रकाशपर्वाचा उत्सव साजरा केला जात होता, त्या काळात हे कुटुंबीय धास्तावलेलं होत. 

तुकाराम माळघरे यांच्या अंगात भूत येतं, त्या भूतामुळेच गावातली जनावरं, आणि काही नागरिकांचा  मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या वृद्धाला विवस्त्र करुन मारहाण केली. 

सुरगाणा पोलिसांनी या प्रकरणी काहीच कारवाई केली नसल्यानं अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं यात उडी घेतलीय.  जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत दोषींवर कारवाईची मागणी अंनिसनं केलीय.
 
जादूटोणा विरोधी कायदा लागू करून वर्षभराचा कालावधी लोटला तरीही अजूनही दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नाही. सरकारनं केवळ कायदा केला मात्र पोलिसांमध्ये या विषयाकडे गांभीर्यानं बघण्याचा दृष्टीकोन निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं या घटनांमधून दिसतंय.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.