एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.

Updated: Oct 20, 2015, 10:49 PM IST
एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार title=

ठाणे : ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.

ठाण्यातील आझाद नगर परिसरात राहणारा अवघ्या 7 वर्षांचा दुर्वेश आज सकाळी त्याच्या आजीसोबत शिकवणीला जात असताना हा प्रकार घडला. ठाण्याच्या श्रीरंग विद्यालयातील तिसरीत शिकणाऱ्या दुर्वेश गिरीचा जागीच मृत्यू झाला तर त्याची ६५ वर्षांची आजी अनिता गिरी या गंभीर जखमी झाल्यात.   

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गतिरोधक उभारण्याची मागणी केलीय. अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.