कल्याणमधील त्या २७ गावांना मोठा धक्का, काँग्रेसने भूमिका बदलली

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर २७ गाव संघर्ष समितीला मोठा धक्का बसलाय. संघर्ष समितिला सुरुवातीपासून पाठींबा देणाऱ्या काँग्रेसनं अचानक आपली भूमिका बदललीये. २७ गावं माहापालिकेतच राहावी, अशी नवी भूमिका कोंग्रेसनं घेतलीये... 

Updated: Oct 20, 2015, 01:15 PM IST
कल्याणमधील त्या २७ गावांना मोठा धक्का, काँग्रेसने भूमिका बदलली title=

कल्याण : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर २७ गाव संघर्ष समितीला मोठा धक्का बसलाय. संघर्ष समितिला सुरुवातीपासून पाठींबा देणाऱ्या काँग्रेसनं अचानक आपली भूमिका बदललीये. २७ गावं माहापालिकेतच राहावी, अशी नवी भूमिका कोंग्रेसनं घेतलीये... 

गावं महापालिकेतच रहावी अशी नवी भूमिका काँग्रेसनं घेतल्याने संघर्ष समितीला मोठा धक्का बसलाय. भाजप आणि संघर्ष समितीमधील वाढती जवळीक काँग्रेसला कमालीची खटकली आहे. संघर्ष समिती भाजपच्या दावणीला बांधली गेली असून एका मोठ्या बिल्डरच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. त्यामुळे समितीमध्ये फुट पडण्याची चिन्ह आहेत.

मनसेनं आधीच संघर्ष समिती ही समेट समिती झाल्याचा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला पोषक, अशी भूमिका घेतल्याने शिवसेना सध्या चांगलीच खुश झाली आहे. 

भाजपनं मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केलाय. आपल्यावरील सर्व आरोप हे केवळ राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. केवळ भ्रम निर्माण करून आमची एकजुट तोडण्यासाठी शिवसेना ही खेळी करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. 

शिवसेनेच्या या खेळीमुळे आतापर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या २७ गाव समितीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजप वगळता समितीला पाठिंबा देणाऱ्या सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐन वेळी भाजपसोबत तडजोड केल्याने बाकीच्या पक्षांना विश्वास घात झाल्याची भावना झाली आहे.  मात्र यामुळे महानगरपालिका निवडणुकीत समितीला अडचण निर्माण होऊ शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.