कडोंमपा अपडेट: शिवसेना उद्या महापौरपदासाठी दावा करणार?

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... ४ अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ ५९च्या घरात पोहोचतंय.

Updated: Nov 4, 2015, 02:39 PM IST
कडोंमपा अपडेट: शिवसेना उद्या महापौरपदासाठी दावा करणार?  title=

कल्याण/डोंबिवली: शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... ४ अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ ५९च्या घरात पोहोचतंय.

भाजपा मात्र स्वतःचे ४२ आणि २७ गाव संघर्ष समितीचे ९ जण असे ५२ जण असल्याचा दावा करतंय. त्यामुळं शिवसेना सत्तेच्या अधिक जवळ पोहोचल्याचं चित्र निर्माण झालंय. 

अधिक वाचा - कडोंमपामध्ये शिवसेनेलाच महापौरपद, भाजप एक पाऊल मागे - सूत्र

अशा स्थितीत मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं शिवसेनेशी संघर्ष टाळायचा ठरवल्याचं बोललं जातंय. महापौरपदावरचा दावा भाजपनं मागे घेतला तर शिवसेनेला सत्ता स्थापन करणं अधिक सोपं होणार आहे. भाजप थेट शिवसेनेला पाठिंबा देऊन स्थायी समितीसह काही महत्त्वाची पदं पदरात पाडून घेणार की विरोधी पक्षात बसणं पसंत करणार, याची उत्सुकता आहे.

मात्र भाजपनं पाठिंबा न दिल्यास जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला मनसेची मदत घ्यावी लागेल.

अधिक वाचा - उद्धव ठाकरे म्हणणार का राजला 'हॅलो ब्रदर'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.