मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी वाटली गाजरं

दिव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी गाजरं वाटत अनोखं आंदोलन केलं आहे.

Updated: Feb 11, 2017, 09:34 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी वाटली गाजरं title=

दिवा : दिव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी गाजरं वाटत अनोखं आंदोलन केलं आहे. मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर जात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना ही गाजरं देण्यात आली.

दरम्यान दिव्यामध्ये झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा वासियांवर आश्वासनांचा पाऊस पाडला. भाजप उमेदवार निवडून आले तर डम्पिंग ग्राऊंडची समस्या मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.