नागपूर : काँग्रेसची प्रचार सभा उधळून लावण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळली गेली. सभेत जोरदार राडा झाल्याने चव्हाण यांना सभा सोडून माघारी परतावे लागले.
नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा होणार होती. त्यासाठी चव्हाण सभे ठिकाणी आले होते. त्याचवेळी काहींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्कीचा प्रकार झाला. त्यामुळे अधिकच गोंधळ झाला.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर यावेळी शाई फेकण्यात आली. ललित बघेल नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केलं. काँग्रेस पक्षांतर्गत वादातून ही सभा उधळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सभा सोडून परत गेले.