'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...

देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय. 

Updated: Nov 25, 2015, 11:53 AM IST
'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...  title=

सांगली : देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय. 

ते सांगलीमध्ये बोलत होते. 'आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता. मात्र, त्यावेळी ज्यांना सत्ता दिली होती, त्यांना देश नीट चालवता आला नाही. त्यामुळे जनतेनं पुन्हा इंदिरा गांधी यांना सत्तेवर आणलं होतं. त्यामुळे आता व्यवस्थित कारभार केला नाही तर, ज्या जनतेनं तुम्हाला सत्ता दिली तीच जनता तुमची सत्ता हिसकावून घेईल असा इशारा' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.


पतंगराव कदम

पवारांनीच करावं तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व - कदम
तर बिहारच्या निवडणुकीपासून देशात तिसरी आघाडी तयार झालेली आहे. तिसऱ्या आघाडीचा पर्याय यापूर्वी शरद पवार यांनी सुचवलेला होता. त्यामुळे, शरद पवार यांनीच या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करावं असं आवाहन, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शरद पवारांना केलं. 

सांगली जिल्ह्यातल्या आष्ठा इथल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.