पुणे : पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयातल्या राखीव खाटांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सजग नागरिक मंचाने पुढाकार घेतलाय.
खाजगी रुग्णालयात गरजुंसाठी रोज ३७ खाटा राखीव ठेवण्याची मनपाची योजना आहे. या योजनेची माहिती देणारे फलकही लावण्यात आलेत. मनपाने काही रूग्णालयांना जास्त एफएसआय दिलाय. त्या बदल्यात या राखीव खाटा देणं अपेक्षित आहे.
मात्र, ही योजना लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे दवाखाने, क्षेत्रीय कार्यालयं आणि अन्य ठिकाणी हे फलक उभारण्याची मागणी मंचाने केली होती. मात्र मनपाने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
त्या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाने स्वतः फलक लावण्याचं काम सुरू केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.