पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती : शरद पवार

संभाजी राजे यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पवारांनी फिरकी टाकली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे.

Updated: Jun 26, 2016, 10:22 PM IST
पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती : शरद पवार title=

कोल्हापूर : संभाजी राजे यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पवारांनी फिरकी टाकली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे.

पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती; मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याची घटना घडली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला कोपरखळी मारली.

'छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे तसे पाहिले तर भाजपने ही नियुक्ती केली असे म्हणता येणार नाही; पण यातून काही राजकीय अर्थही निघू शकतात. आजपर्यंत छत्रपतीच पेशव्यांची निवड करत होते. 

पेशवे फडणवीसांची नियुक्‍ती करायचे; मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याचे यापूर्वी कधी घडले नव्हते ते आता घडले",  संभाजीराजे छत्रपती यांची अलीकडेच राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. त्यावर पवार बोलत होते.