'शरद पवारांच्या बँकेत फक्त अजित पवार उरले'

पुण्यात गर्दी नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची पिंपरी चिंचवडमधली सभा गर्दीत पार पडली.

Updated: Feb 18, 2017, 07:19 PM IST
'शरद पवारांच्या बँकेत फक्त अजित पवार उरले' title=

पिंपरी चिंचवड : पुण्यात गर्दी नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची पिंपरी चिंचवडमधली सभा गर्दीत पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं.

भाजपची बँक ही नरेंद्र मोदी आणि जनतेची आहे. तर शरद पवार यांच्या बँकेत फक्त अजित पवार उरलेत. शिवसेना आणि मनसेची अवस्था आमची कुठेही शाखा नाही अशी झाल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.