मुंबई : लातूरमध्ये पाण्याची भीषण अवस्था आहे. पाण्यासाठी घरातला प्रत्येक माणूस हा भटकत आहे. अशा परिस्थितीत एक गंभीर आजार महाराष्ट्रातील तरुणींमध्ये आढळून आलाय.
२० ते ३० वयातीय तरुणींमध्ये आढळून आलेल्या या विचित्र आजारा बाबत काहीही माहिती मिळत नाहीये. अनेक मोठ्या रिसर्च संस्था याचा शोध लावण्याचा प्रयत्न करताय पण यामध्ये अजून तरी कोणतंही यश मिळालेलं नाही.
महिलांच्या स्तनात गाठ होण्याचं प्रमाण वाढलंय. अगदी कमी वयाच्या तरुणींमध्ये हे प्रमाण वाढत असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारचं स्तन आजार आढळून आल्याने डॉक्टरांना ही याबाबत काहीही निष्कर्ष काढणे कठिन झालंय. त्यामुळे दुष्काळग्रस्त महाराष्ट्रावर आणखी एक गंभीर संकट घोंगावतंय.