ठाणे : जेलमधल्या कैद्यांनी नियमाने योगा केला, तर त्यांचा तीन महिने तुरूंगवास माफ होणार आहे. ठाणे सेट्रल जेलनं हा नवा नियम केलाय.
ठाणे सेंट्रल जेल आणि पतंजली योगा मंचच्या वतीनं सध्या तुरुंगात योगाचे धडे दिले जातायत. रोज सकाळी सात ते आठच्या दरम्यान हा योगावर्ग असतो.
पुढच्या काही काळात योगाच्या परीक्षाही घेतल्या जाणार आहेत. ज्या कैद्यांना त्यात चांगले गुण मिळतील, त्यांची शिक्षा तीन महिन्यांनी कमी होणार आहे. कैद्यांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय.