पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये काही वर्षांपूर्वी साधे लेक्चरर असलेले उदय साळुंखे... आज महागड्या गाड्या, आलिशान फ्लॅट, बंगले, परदेशवा-या आणि अनेक कंपन्यांचे संचालक अशी प्रगती त्यांनी साधलीय. ही उड्डाणं त्यांनी कशी घेतली, हा प्रश्न इन्कम टॅक्स खात्यालाही पडला...
उदय साळुंखे… वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधील एकेकाळचे साधे लेक्चरर आणि आता संस्थेचे संचालक किंवा सर्वेसर्वा… साळुंखेंच्या संपत्तीबद्दल खुद्द इन्कम टॅक्स विभागाचं काय म्हणणं आहे, ते पाहा...
१. उदय साळुंखे यांचे वडील गिरणी कामगार होते. उदय साळुंखे कुर्ल्यातील एका चाळीत राहायचे.
२. १९९५ मध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये साधे लेक्चरर म्हणून ते कमी पगारावर जॉईन झाले.
३. त्यानंतर मात्र त्यांनी घेतलेली आर्थिक भरारी अभ्यास करण्यासारखी आहे, असं इन्कम टॅक्स विभागाचं म्हणणं आहे.
४. पेशाने प्राध्यापक असलेल्या उदय साळुंखेंकडे होंडा अकॉर्ड ही लक्जरी कार आहे.
५. साळुंखे यांच्या पत्नीकडे देखील स्वतःची मल्टी युटीलिटी व्हेहिकल आहे.
६. वेलिंगकरमध्ये आल्यानंतरच साळुंखे यांनी माहिमच्या उच्चभ्रू वस्तीत टेरेस गार्डन असलेला डुप्लेक्स flat घेतला.
७. या flat च्या इंटेरिअरवर देखील प्रचंड खर्च करण्यात आल्याचं इन्कम टॅक्स विभागाचं म्हणणं आहे.
८. याशिवाय साळुंखे यांचे लोणावळ्यात देखील दोन बंगले आहेत, असंही इन्कम टॅक्सच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
इन्कम टॅक्स विभागानंच उघड केलेली उदय साळुंखे यांची प्रगती तुम्ही पहिलीत… आजही त्यांना महिन्याला लाखभर रूपये वेतन मिळतं. त्याशिवाय ते खासगी कन्सल्टन्सीचा व्यवसाय देखील करतात… त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळतं. मात्र या उत्पन्नापेक्षाही कितीतरी अधिक पटीनं जास्त त्यांचे व्यवहार आहेत, असा आरोप संस्थेच्या नियामक मंडळातील सदस्यच करत आहेत.
1. त्यांच्या म्हणण्यानुसार, उदय साळुंखे यांच्या वर्षभर परदेश वाऱ्या सुरु असतात.
२. महिनोन महिने त्यांचं विदेशात वास्तव्य असतं.
३. साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे तेरा कंपन्या आहेत. त्यांचं भाग भांडवल 40 कोटींच्या घरात आहे.
४. खुद्द साळुंखे यांच्या बँक खात्यामधून देखील कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं दिसतंय.
५. याशिवाय लोणावळ्याजवळ त्यांच्या पत्नीची खासगी शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहे. साळुंखेंच्या वेलिंगकर प्रवेशानंतरच ही इन्स्टिट्यूट सुरू झालीय.
साळुंखेंनी वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधूनच ही कोट्यवधींची माया जमवली असल्याचा आरोप शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश पवार करताहेत.
एकीकडं उदय साळुंखेंनी इतकी प्रगती साधलीय. तर दुसरीकडं शिक्षण प्रसारक मंडळीची आर्थिक स्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चाललीय, असा आरोप नियामक मंडळाचे सदस्य करतायेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.