राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला

पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे काही अंशी का होईना बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. 

Updated: Sep 11, 2015, 09:41 AM IST
राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला  title=

लातूर : पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे काही अंशी का होईना बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. 

भविष्यातील पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्यानं वातावरणात गारव्याबरोबरच आनंदही आहे.

संपूर्ण महाराष्ट्र ज्या परतीच्या पावसाकडे डोळे लाऊन बसला होता, त्यानं राज्याला निराश केलं नाही. दरम्यान, मुंबईसह कोकणात चांगला पाऊस झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.