इचलकरंजी: जीवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय नराधम सादी इमाम हुसेन लाडखान याला इचलकरंजी पोलिसांनी अटक केलीय.
पिडीत मुलगी इचलकरंजीतील संतमळा परिसरात राहणारी असून ती नववीच्या वर्गात शिकत आहे. याच परिसरात संशयित आरोपी भाड्याच्या घरात राहातो. त्याच्या घरात कोणीही सदस्य राहत नाही. याचा फायदा घेत सादीइमामनं, आपल्याला कोणी नाही त्यामुळं घरातील भांडी धुण्याच्या बहाण्यानं त्यानं पिढीत मुलीला घरात बोलावलं. घरात बोल्यावल्यानंतर सादीइमामनं तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, लाडखान याला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला त्याचबरोबर त्याचं मुंडण करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.