मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.

Updated: Nov 16, 2015, 05:14 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात title=

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे ठाण्याच्या टोल प्लाझाजवळून जात असताना हा अपघात घडलाय. राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या गाड्यांच्या फौजफाट्यापैंकी एका गाडीनंच राज ठाकरेंच्या लँड क्रूझर या एसयूव्ही गाडीला मागच्या बाजुनं ठोकर दिली. 

अधिक वाचा - मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबद्दल कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. 

घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी लगेचच राज ठाकरे यांच्यासाठी दुसऱ्या गाडीचा बंदोबस्त केला. यानंतर ते नाशिकसाठी रवाना झाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.